IAS Transfer : राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यात प्रशासकीय खांदेपालट सुरूच असून आताही आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पंतप्रधान कार्यात प्रतिनियुक्तीवर गेलेले नवल किशोर राम (Naval Kishor Ram) यांची बदली पुन्हा एकदा पुण्यात करण्यात आली आहे.

त्यांच्याकडे आता पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तर शितल तेली उगळे (Sheetal Teli-Ugale) यांच्याकडे पुण्यातील क्रीडा आणि युवा आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

ज्येष्ठ आयएएस अधिकारी जे एस पापळकर यांच्याकडे धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी होती. त्यांची बदली आता छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदी भाग्यश्री विसपुते यांची बदली करण्यात आली आहे. सी के डांगे यांच्याकडे आता सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव कार्यालयाच्या सहसचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची बदली बृहन्मुंबई जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी आशिष येरेकर यांची बदली करण्यात आली आहे.

Maharashtra IAS Transfer List : कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?

1. नवल किशोर राम (IAS:RR:2008) – आयुक्त, पुणे महानगरपालिका
2. शीतल तेली-उगले (IAS:RR:2009) – क्रीडा आणि युवा आयुक्त, पुणे
3. जे.एस. पापळकर (IAS:SCS:2010) – विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर
4. सी.के. डांगे (IAS:SCS:2010) – सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग
5. सौरभ कटियार (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा
6. भाग्यश्री विसपुते (IAS:RR:2017) जिल्हाधिकारी, धुळे
7. आनंद भंडारी (IAS:NON-SCS:2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा परिषद
8. आशिष येरेकर (IAS:RR:2018) जिल्हाधिकारी, अमरावती

या आधी बदल्या झालेले अधिकारी कोण?

1. अभिषेक कृष्णा (आयएएस: आरआर: 2006) सदस्य सचिव, महा. जीवन प्राधिकरण मुंबई यांची संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. अविनाश पाठक (आयएएस: एससीएस: 2013) जिल्हाधिकारी, बीड यांना व्यवस्थापकीय संचालकपदी, मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.
3. विवेक जॉन्सन (आयएएस: आरआर: 2018) मुख्य कार्यकारी अधिकारी, झेड.पी., चंद्रपूर यांना बीड येथे नियुक्त करण्यात आले आहे.
4. शुभम गुप्ता (आयएएस: आरआर: 2019) सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांना व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
5. पुलकित सिंग (आयएएस: आरआर: 2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, अंबड उपविभाग, जालना यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, झेड.पी., चंद्रपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 22-05-2025