देवरुख : परिसरात बुधवार, दि. २१ रोजी दुपारनंतर मुसळधार पाऊस पडला. या पावसाने शहरातील दत्तनगर परिसरातील द्रौपदी इन हॉटेलच्या बाजूला असलेल्या तीन घरांमध्ये गटाराचे पाणी शिरून नुकसान झाले आहे. विहिरीतही गटाराचे पाणी गेल्याने येथील ३ कुटुंबांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे.
मुसळधार पावसाने देवरुख येथील शाळा क्रमांक ३, देवरुख न्यायालय या सर्व परिसरातील पाणी येथील घरांमध्ये शिरले. या परिसरातील गटारांच्या सांडपाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या समस्येबाबत येथील नागरिक रवींद्र कळंबटे, हरिश्चंद्र कळंबटे, कृष्णा खापरे यांनी नगरपंचायतीला निवेदन दिले आहे. या परिसराची पाहणी करून ही समस्या मार्गी लावावी, अशी विनंती या निवेदनातून केली आहे.
पहिल्याच पावसात अशी परिस्थिती असेल तर आगामी काळात ही समस्या गंभीर होणार आहे. त्यामुळे नगरपंचायतीने ही समस्या विचारात घेऊन त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 22/May/2025














