आंबोली घाटात दरड कोसळली, वाहनांच्या रांगा..

आंबोली घाटात सावंतवाडीच्या दिशेने काही अंतरावर आज सकाळी दरड कोसळली आहे.

मुसळधार पावसामुळे डोंगरावरून 40 फूट मोहरीच्या ठिकाणी दरड कोसळल्याने दोन्ही बाजूने वाहनांची मोठी रांग लागली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दरड हटविण्याचे काम सुरू केले असून घाटात सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे.

सध्या राज्यभर सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठी पडझड होत असून अनेक ठिकाणी भिंती खचत आहेत .दरड कोसळत असल्याने वाहतूक कोंडीही होत आहे .

पूर्व मान्सून सुरू झाल्यावरच दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून पावसाळ्यापूर्वी आंबोली घाटातील धोकादायक ठिकाणी दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 22-05-2025