चिपळूण-बेळगाव एसटीचा ट्रकसोबत अपघात

चिपळूण : चिपळूणहून बेळगावच्या दिशेने निघालेल्या चिपळूण-बेळगाव एसटी बसचा मंगळवारी (२० मे २०२५ रोजी) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास कोयना टोलनाका परिसरात ट्रकसोबत अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, ५० हून अधिक प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, बसचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

चिपळूण आगारातून दररोजप्रमाणे सकाळी ५.३० वाजता चिपळूणहून बेळगावच्या दिशेने ही एसटी बस (एमएच २० बीएम १२) रवाना झाली होती. बस कोयना टोलनाक्याजवळ पोहोचली असता, हा अपघात घडला. संदेश गुरव हे बसचे चालक होते. अपघातानंतर बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवून दुसऱ्या वाहनाने पुढील प्रवासाची सोय करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता, मात्र त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:50 PM 22/May/2025