रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत उद्या (२३ मे) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे: २३ मे रोजी सकाळी ९ वाजता जनशताब्दी एक्सप्रेसने (गाडी नं. १२०५१) चिपळूण रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, चिपळूण कडे प्रयाण. सकाळी ९.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथे आगमन व राखीव. सकाळी १०.३० वाजता चिपळूण व गुहागर तालुका मान्सून पूर्व आढावा बैठक (स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पंचायत समिती, चिपळूण). सकाळी ११.३० वाजता पत्रकार परिषद (स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पंचायत समिती, चिपळूण). दुपारी १२.३० वाजता लोटे परशुराम म.औ.वि.म. क्षेत्र आढावा व पाहणी (स्थळः उद्योग भवन, लोटे परशुराम म.औ.वि.म. क्षेत्र, ता. खेड, जि. रत्नागिरी). दुपारी २ वाजता लोटे, ता. खेड, जि. रत्नागिरी येथून मोटारीने चिंचघर, ता. खेड कडे प्रयाण. दुपारी ३ वाजता श्री भैरवनाथ मंदिर चिंचघर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती (स्थळ: श्री भैरवनाथ मंदिर चिचघर, डेंटल कॉलेज समोर) ता. खेड, जि. रत्नागिरी. सायंकाळी सोईनुसार चिंचघर ता. खेड येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. सायंकाळी सोईनुसार रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
शनिवारी (२४ मे) सकाळी ८.३० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, रत्नागिरी आढावा बैठक (स्थळ: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी) सकाळी ९.१५ वाजता कर्करोग तपासणी मोहिम शुभारंभ (Cancer Diagnostics Van) (स्थळ: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार, रत्नागिरी) सकाळी ९.३० वाजता श्री. प्रभात भालेकर यांच्या नूतन वास्तूच्या निमित्ताने सदिच्छा भेट (स्थळ : प्लॉट क्र. ६, विश्वनगर, गजानन महाराज मंदिराजवळ, रत्नागिरी) सकाळी ११ वाजता संगमेश्वर ट्रॉमा केअर केंद्र पहाणी. सकाळी ११.३० वाजता संगमेश्वर बसस्थानक पहाणी व आढावा. (स्थळ: संगमेश्वर बसस्थानक). दुपारी १२.३० वाजता महात्मा गांधी तंटामुक्त व निर्मल ग्रामपंचायत काटवली नूतन ग्रा.प. इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : ग्रामपंचायत काटवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी). दुपारी १.३० वाजता राखीव. दुपारी २.३० वाजता काटवली, ता. संगमेश्वर येथून मोटारीने महाड, जि. रायगड कडे प्रयाण.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:59 PM 22/May/2025












