चिपळुणात भरपावसात सिंदूर तिरंगा रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण : भारतमाता की जय, वंदे मातरम्, जय जवान जय किसान, हमसें जो टकरायेगा मिट्टीमें मिल जायेगा… पाकिस्तान मुर्दाबाद… यांसारख्या गगनभेदी घोषणा देत बुधवारी सायंकाळी चिपळूणकरांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले. निमित्त होतं चिपळुणातून काढलेल्या सिंदूर तिरंगा रॅलीचे. विशेष म्हणचे भरपावसातही या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवणाऱ्या भारतीय लष्कराचे मनोबळ वाढवण्यासाठी चिपळूणकरांनी या रॅलीचे नियोजन केले होते. ध्वनिप्रक्षेपणातून देशभक्तिपर गीते, सायकल आणि दुचाकीस्वारांनी हातात तिरंगा झेंडे घेत ही रॅलो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून सुरू झाली, यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. पावसाने हजेरी लावली
असली, तरी देशप्रेमी नागरिकांनी आपल्य उत्साह कायम ठेवला होता.

या रॅलीत राजकीय पक्ष, चिपळूण सायकलिंग क्लब, विविध सामाजिक संस्था, संघटना व मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांसह विद्यार्थी व तस्पाईनेही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. पुये ही रॅली काविळतळी, मार्कडीमार्गे शहरातील छरपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत आली. या ठिकाणी पुतळ्याला अभिवादन करून ही रैली चिंचनाका बाजारपेठ, नाईकपूल, गोवळकोट रोडमार्गे, श्री देवी करंजेश्वरी कमानीपासून डाव्या बाजूने उक्ताड, भेंडीनाका, अर्बन बँक, जुना स्टैंड, इंदिरा गांधी केंद्रापर्यंत काढण्यात आली.

या ठिकाणी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रॅलीत माजी आमदार सदानंद चव्हाण, उमेश सकपाळ, शशिकांत मोदी, नितीन उर्फ अबू ठसाळे, आशिष खातू निलेश कदम, अनिरुद्ध निकम, निहार कोवले, सचिन शेट्ये, आदिती देशपांडे, चित्रा चव्हाण, दिशा दाभोळकर, डॉ. शामीना परकार, रविना गुजर, शीतल रानडे, विनोद भोवस्कर, मनाली जाधव, स्वाती भोजने, विकी लवेकर, कैसर देसाई आदीसह चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पोलिसांचा बंदोबस्त
चिपळुणात काढण्यात आलेल्या सिंदूर तिरंगा रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. रॅलीचे नियोजन करण्यासाठी शहराच्या प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 23/May/2025