गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात रस्त्याच्या दोन्ही बाजूने काँक्रिट गटारी बांधण्यात आल्या आहेत; मात्र, त्यांची कामे अर्धवट व निकृष्ट झाल्याने या गटारींमध्ये मोकाट जनावरे पडून जखमी होत आहेत. या विरोधात गुहागर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे यांनी नाराजी व्यक्त केली असून, निकृष्ट बांधकामाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात शृंगारतळी जानवळे फाटा ते मच्छी मार्केटपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने काँक्रिटची गटारी बांधण्यात आली आहेत. शहरातील गटारींची काही कामे अर्धवट आहेत, तर काही कामे पूर्ण झाली आहेत. हे बांधकामे निकृष्ट असल्याचे चित्र आहे.
काँक्रिट पडून लोखंडी सळ्या बाहेर येणे, मध्येच काँक्रिटला तडे जाणे व बांधकाम ढासळणे, असे प्रकार सुरू आहेत. मध्यंतरी गटारीमध्ये माणसेही पडण्याचे प्रकारी घडले होते. हॉटेल कोकणरत्नसमोर काँक्रिट गटारात एक वासरू पडले आणि जखमी झाले. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी बाबू तेलगडे व काही नागरिकांनी या वासराला बाहेर काढले,
वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे येथील काँक्रिटची गटारी जीवघेणी ठरली आहेत. अर्धवट गटारींची कामे पूर्ण करून जो तुटलेली आहेत, त्यांचीही दुरुस्ती व्हावी. अन्यथा, आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा प्रसाद कुष्टे यांनी दिला आहे.
बांधकामाची चौकशी करा
तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात रस्त्याच्या दोन्ही बाजूने काँक्रीट गटारी बांधण्यात आल्या आहेत. मात्र, त्त्यांची कामे अनेक ठिकाणी अर्धवट आणि निकृष्ट झाली आहेत. त्यामुळे या गटारीमध्ये नागरिकांसह जनावरे पडण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे जीवितहानीही होण्याचे धोके वाढले आहेत. या निकृष्ट गटारीच्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 23/May/2025














