संगमेश्वर येथील रस्त्यावर खड्डे

संगमेश्वर : मॉन्सून पावसामुळे कोकणातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा समोर आली आहे. संगमेश्वर ते शास्त्रीपूल दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे पडले असून, यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे हाल सुरू आहेत. विशेषतः माभळे येथे पडलेला मोठा खड्डा हे अपघाताचे केंद्र ठरले आहे.

या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना गती कमी करावी लागत असून अपघात घडत आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी परतीचा प्रवास अडथळ्यांचा ठरत आहे. स्थानिक प्रशासनाने त्वरित खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 23/May/2025