रत्नागिरी : गेले तीन दिवस जिल्ह्यात सुरू असलेला वादळी वारा आणि पाऊस यामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा बाधित आहे. जिल्ह्यातील 908 गावांमधील 3 लाख 31 हजार 276 ग्राहकांची त्यामुळे गैरसोय झाली आहे.
खांब पडणे, वीज यंत्रणेवर झाड पडणे आदी कारणांमुळे हा पुरवठा बाधित आहे. कमीत कमी वेळेत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा महावितरणचा प्रयत्न सुरू आहे. ग्राहकांचा वीजपुरवठा लवकर सुरू करण्याकरिता महावितरण कर्मचारी व अधिकारी अथक परिश्रम घेत अहोरात्र काम करत आहेत. वीज ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
वीज ग्राहक अधिक माहितीकरिता व आपल्या तक्रारी नोंदवण्याकरिता 1912, 1800-233-3435 आणि 1800-212-3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.
जिल्ह्यातील बाधित वीजपुरवठ्याच्या अनुषंगाने महावितरणने दिलेली माहिती अशी –
(एकूण बाधित / एकूण पूर्ववत)
बाधित उपकेंद्रे – 17/17
बाधित उच्चदाब वाहिन्या – 72/66
पडलेले लघुदाब खांब – 65/49
पडलेले उच्चदाब खांब – 42/14
बाधित रोहित्रे – 4257/4126
प्रभावित गावे – 908/878
प्रभावित ग्राहक – 331276/ 322941
महावितरणचे अंदाजित नुकसान – 34 लाख.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 23-05-2025














