रत्नागिरी, २३ मे २०२५: रत्नागिरी जिल्ह्यात आज (२३ मे २०२५) आज सकाळपर्यंत नोंद झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार पावासने जोरदार पावसाने हजेरी लावली असून, जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचा एकूण पाऊस ९३५.९२ मिमी इतका नोंदवला गेला असून, सरासरी पाऊस १०३.९९ मिमी आहे.
जिल्ह्यातील तालुक्यांनुसार पावसाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
मंडणगड: २७.७५ मिमी
खेड: ९४.२८ मिमी
दापोली: १०५.७१ मिमी
चिपळून: ९९.२२ मिमी
गुहागर: १९०.४० मिमी (सर्वाधिक पाऊस)
संगमेश्वर: ११६.४५ मिमी
रत्नागिरी: १२४.११ मिमी
लांजा: १२८.०० मिमी
राजापूर: ५०.०० मिमी
गुहागर तालुक्यात सर्वाधिक १९०.४० मिमी पावसाची नोंद झाली, तर मंडणगडमध्ये सर्वात कमी २७.७५ मिमी पाऊस पडला. या पावसामुळे शेती आणि पाणीपुरवठ्याला लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु काही भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती आणि वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. पावसाचा जोर पाहता येत्या काही दिवसांतही जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 23-05-2025














