महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरीचा डिप्लोमा इन टेक्स्टाइल ॲन्ड फॅशन डिझायनिंगचा निकाल १००%

रत्नागिरी, २३ मे २०२५ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे, रत्नागिरी येथील महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, जे एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्न आहे, येथील डिप्लोमा इन टेक्स्टाइल ॲन्ड फॅशन डिझायनिंग (DTFD) कोर्सच्या पहिल्या बॅचचा निकाल १००% लागला आहे. २०२३ पासून सुरू झालेल्या या कोर्समधील सर्व विद्यार्थिनी उत्तम गुणांसह उत्तीर्ण झाल्या आहेत.

द्वितीय वर्ष निकाल:

  • प्रथम क्रमांक: कु. गीतांजली बडबे – ७२%
  • द्वितीय क्रमांक: कु. विरश्री सुर्वे – ७१.४७%
  • तृतीय क्रमांक: कु. लता राऊत – ६९.३३%

प्रथम वर्ष निकाल:

  • प्रथम क्रमांक: कु. सारिका गवाणकर – ७९.७८%
  • द्वितीय क्रमांक: कु. शृंखला आडवीरकर – ७५.११%
  • तृतीय क्रमांक: कु. श्रद्धा चव्हाण – ७१.५६%

या अभ्यासक्रमात विद्यार्थिनींना बेसिक डिझायनिंग, डाईंग ॲन्ड प्रिंटिंग, एम्ब्रॉयडरी आणि कॅलिग्राफी यासारख्या विषयांचे प्रात्यक्षिक ज्ञान आणि प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय, संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी इंग्लिश विषयाचे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले. विद्यार्थिनींना कोल्हापूर येथील रेमंडसारख्या नामांकित टेक्स्टाइल इंडस्ट्रीला भेट देण्याची संधी मिळाली. तसेच, त्यांनी रत्नागिरी येथे ३ ते ४ फॅशन शोमध्ये सहभाग घेतला. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींना कोल्हापूर येथील गारमेंट व टेक्स्टाइल इंडस्ट्री तसेच बुटीकमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली.

या यशस्वी विद्यार्थिनींचे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपकार्याध्यक्षा तसेच रत्नागिरी प्रकल्प अध्यक्ष श्रीमती विद्याताई कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख श्री. मंदार सावंत देसाई, प्राचार्या स्नेहा कोतवडेकर, प्रकल्प समन्वयक श्री. स्वप्निल सावंत यांच्यासह संस्थेच्या सर्व सदस्यांनी, शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 23-05-2025