दापोली नगराध्यक्षपदासाठी कृपा घाग यांचा एकमेव अर्ज

दापोली : दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका कृपा घाग यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.

दापोली नगरपंचायतीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना उबाठा गटाच्या नगराध्यक्ष ममता मोरे याच्या विरोधात सर्व नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी यांनी याची अंमलबजावणी केली. यावेळी सदर ठराव १६ विरुद्ध १ १ मतांनी मतांनी मंजूर करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे मोरे यांच्या नगराध्यक्षपदावर अनिश्चिततेची टांगती तलवार कायम होती.

या ठरावाच्या विरोधात मोरे यांनी उच्चन्यायालयात धाव घेतली. कोणत्याही प्रकारचा ठराव मांडण्यात आला नाही. यामुळे प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 23/May/2025