संगमेश्वर : संगमेश्वर खाडी विभागातील फुणगूस पंचायत समिती गणातील इमारत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप तसेच मोफत आरोग्य शिबिराचे शिवसेना संघटना खाडी विभागातर्फे करण्यात आले.
बांधकाम कामगारांना एमआयडीसी गोदामातून भांडी आणावी लागत होती; मात्र प्रचंड उन्हाळा असल्याने होणारी गर्दी आणि वाहतूक खर्च लक्षात घेता पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या सूचनेनुसार, खाडी विभागातील गावांसाठी परचुरी वेल्येवाडी येथील श्री गणेशमंदिर प्रांगणात साहित्य वाटप आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचा लाभ पोचरी, देण, परचुरी, कोंडये, मेढेतर्फे फुणगूस, डावखोल, उपले, मांजरे आदी गावांतील लाभार्थ्यांनी घेतला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश मुकादम, उपतालुकाप्रमुख परशुराम वेल्ये, विभागप्रमुख महेश देसाई, महिला विभागप्रमुख पूनम देसाई, परचुरीच्या सरपंच शर्वरी वेल्ये, पोचरीचे शाखाप्रमुख अक्षय देसाई, उपविभागप्रमुख विश्वास घेवडे, उपविभाग संघटक दिनेश शीतप, दीपक लिंगायत, विश्वास दसम पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 23/May/2025














