मंडणगड : केरीळ ग्रामदेवतेच्या मंदिराचा जीर्णोद्धार उत्साहात

मंडणगड : तालुक्यातील केरीळ येथील श्री देवी पद्मावती, देवी कालेश्वरी व देवी कालकाय ग्रामदेवतांच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा, मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम नुकताच पार पडला. ज्येष्ठ ग्रामस्थ रामचंद्र मेडेकर, गणपत मेडेकर यांच्या हस्ते या सोहळ्याला सुरुवात झाली.

केरीळ येथे झालेल्या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामविकास मंडळ व महिला मंडळाने केले. मूर्तीची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली व मूर्ती मंदिरात नेण्यात आल्या. होमहवन करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून १०वी, १२वी व पदवीधर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समाजनेते भाईसाहेब पोस्टुरे, माजी जि. प. सदस्य प्रकाश शिगवण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुजफ्फर मुकादम, उद्योजक मनोज घागरूम, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त रमेश घडवले, ग्रामपंचायत सदस्य वसिम चिपोळकर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 23/May/2025