रत्नागिरी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

रत्नागिरी : जी. एच. रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा २०२५-२६ रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ डी संघटनेतर्फे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत विविध गटांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना रोख पारितोषिके आणि आकर्षक चषक वे देऊन गौरवण्यात आले. ९ वर्षांखालील गटातून दोन मुले व १५ वर्षे वयोगटातून ४ खेळाडूंची निवड महाराष्ट्र राज्य निवड स्पर्धेसाठी करण्यात आली. निवड झालेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

प्रथम ९ व १५ वर्षांखालील गटांच्या निवड स्पर्धा खेळवण्यात आल्या. या स्पर्धांच्या बक्षीस समारंभाला जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ बुद्धिबळ खेळाडू सुभाष शिरधनकर व चेसमेन रत्नागिरीचे सचिव व ज्येष्ठ बुद्धिबळ खेळाडू सुहास कामतेकर उपस्थित होते.

विजेत्यांची नावे गुणानुक्रमे अशी: १५ वर्षांखालील गट अर्णव चव्हाण, आर्यन धुळप, आयुष रायकर, निधी मुळे; उत्तेजनार्थ : राघव पाध्ये, ओम तेरसे, रुमिन वस्ता. मुली- सई प्रभुदेसाई, सानवी दामले, तनया आंब्रे, आर्या पळसुलेदेसाई, उत्तेजनार्थ : मृण्मयी दांडेकर, साची चाळके. ९ वर्षांखालील गट विहंग सावंत, पारस मुंडेकर, उत्तेजनार्थ अर्णव गावखडकर, रजत जोगळेकर.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 23/May/2025