रत्नागिरी : जिल्ह्यात भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएलची) सेवा म्हणजे एखाद्या रुग्णाचे सर्व अवयव निकामी होऊन ती व्हेंटिलेटरवर गेल्यासारखी आहे. जिल्ह्यातील १०६ टॉवरपैकी बीएसएनलचे ४८ टॉवर बंद आहेत. काही ठिकाणी बॅटरी नाही, महावितरणची जोडणी नाही, जनरेटरला डिझेल नाही, सोलर पॅनल नाही, बिल न भरल्याने विद्युतपुरवठा बंद आहे, अशी वाईट अवस्था आहे. यावर कंपनीकडे काहीच उपाययोजना नाहीत.
यात सुधारणा न झाल्यास मुंबई कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला. यावेळी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांबरोबर शिवसैनिकांची शाब्दिक चकमक झाली.
माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक काल बीएसएनएलच्या खराब सेवेचा जाब विचारण्यासाठी येथील मुख्य प्रबंधक कार्यालयावर धडकले, यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, संजय पुनसकर, देसाई आदी उपस्थित होते. मुख्य प्रबंधक अमृता लेले, बोंगले, शिरसाट आदी बीएसएनएलचे अधिकारी उपस्थित होते.
माजी खासदार राऊत यांनी रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरुख आदी भागांतील बीएसएनएलच्या कोलमडलेल्या सेवेबाबत विचारणा केली. प्रत्येक टॉवरनिहाय सेवेचा आढावा घेतला. रत्नागिरीमध्येच स्टेट बैंक कॉलनी, मिऱ्या झाडगाव, आदी भागांमध्ये बीएसएनएलजी रेंज येत नाही. कॉल एकमार्गी होणे, ऐकायला न जाणे अशा तक्रारी केल्या, तुम्ही सेवेत सुधारणा करणार नसाल, तर आम्ही कार्ड बदलू असा इशाराही देण्यात आला. याबाबत वर्षानुवर्षे तक्रारी केल्या जात आहेत: परंतु तक्रारी करूनही सुधारणा नाही. फोन केला तर कर्मचारी अरेरावीची भाषा करत आहेत हे योग्य नाही, असे सांगण्यात आले. याबाबत मुख्य प्रबंधक अमृता लेले यांनी तक्रारीबाबत संपूर्ण माहिती लिहून घेतली आणि त्या लवकरात लवकर सोडवू आश्वासन दिले. तसे अपशब्द वापरता चर्चा करू, असेही स्पष्ट केले.
रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार निद्रिस्त
बीएसएनएलची कंपनी केंद्र शासनाच्या अखत्यारित येते त्यामुळे खासदारांनी या सेवेबाबत आढावा बैठक घेणे आवश्यक आहे तीन महिन्यांनी आढावा बैठक घेतली जाते परंतु आपले खासदार निद्रिस्त आहेत. वर्ष झाले, एकही बैठक झालेली नाही. त्यांना जनतेच्या प्रश्नाशी घेणे-देणे नाही. खासदार निद्रिस्त मिळाल्याने टॉवर व्हेंटिलेटरवर गेले, असा असा टोला विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणे यांना लगावला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 23/May/2025














