खेड : खेड-सवेणी मार्गावरील मोहल्ला स्टॉपजवळ बुधवारी (२१ मे) सायंकाळी ३.४० वाजण्याच्या सुमारास चालत्या ट्रॅक्टरमधून पडून एक महिला जखमी झाली. आरती यादव (वय ३०, रा. उत्तरप्रदेश, सध्या खेड) असे जखमी महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर सवेणी मोहल्लाजवळ असलेल्या गतिरोधकावर आदळल्याने, ट्रॅक्टरमधून प्रवास करणारी आरती यादव बाहेर फेकली गेली आणि जखमी झाली. सामाजिक कार्यकर्ते सूरज हंबीर यांनी त्याला तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 23/May/2025














