जयगड येथे बेशुद्धावस्थेत सापडलेल्या प्रौढाचा मृत्यू

गणपतीपुळे : जयगड येथील जिंदल कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेशुद्धावस्थेत सापडलेल्या प्रौढाचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. चाँदमिया हसनमियाँ नेवरेकर (५२, रा. शम्स मोहल्ला जयगड, रत्नागिरी) असे प्रौढाचे नाव आहे.

चाँदमिया नेवरेकर यांना दारुचे व्यसन होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. बुधवारी सकाळी त्यांचा पुन्हा शोध घेत असताना ते जयगड बौद्धवाडी ते जिंदल कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला झाडाखाली बेशुद्धावस्थेत सापडले. त्यांना उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटद खंडाळा येथे दाखल केले असता मत घोषित करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 23/May/2025