पावस : घरावर झाड पडून ९५ हजारांचे नुकसान

पावस: पावस पंचक्रोशीत गुरुवारी (ता. २२) झालेल्या वादळी पावसामध्ये पावस-गुरववाडी येथील प्रकाश दत्ताराम गुरव यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे ९५ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

पावस परिसरामध्ये गेले तीन दिवस संततधार सुरू असून वाऱ्याचा वेगही वाढला आहे. गुरुवारी दुपारी पावस-गुरववाडी येथील गुरव यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तसेच या झाडामुळे त्यांच्या घराजवळ असलेले दोन विजेचे खांब तुटल्याने या भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. या भागातील सिमेंटचे खांब उभे करून विद्युतपुरवठा सुरळीत केला, तर गुरव यांच्या घरावर झाड पडल्याने तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. यामध्ये गुरव यांच्या घराचे ९५ हजाराचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आंब्याचे झाड घरापासून वेगळे करण्यात आले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 24/May/2025