संगमेश्वर : नवीन शैक्षणिक व आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना अनेक प्रकारांचे दाखले आवश्यक असतात. त्यांना देवरूखपर्यंत फेऱ्या माराव्या लागतात.
शालेय प्रवेशासाठी दाखले उपलब्ध व्हावेत व शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यासाठी देवरूख (संगमेश्वर) या ठिकाणी अनेक फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी तालुक्यात विभागवार, तारीखवार नियोजन केले आहे.
आर्थिक व शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या दाखल्यांचे कॅम्पचे आयोजन केले आहे. आपल्या परिसरातील जवळच्या ठिकाणी संबंधित विद्यार्थी व पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह संपर्क करून लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. इतर गावांतील नागरिकांनी आपल्याजवळच्या महा ई-सेवा/आपले सरकार केंद्रावर जाऊन आपल्याला लागणारे सर्व प्रकारचे दाखले वेळीच काढून घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 24/May/2025














