रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात व्होकेशनलचे प्रवेश सुरू

रत्नागिरी : येथील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीचे एमसीव्हीसी (व्होकेशनल) अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले आहेत. महाविद्यालयात एमसीव्हीसीचे विविध कोर्सेस आहेत. यामध्ये अकाऊंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट, लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे.

या अभ्यासक्रमांसाठी अभ्यंकर कनिष्ठ महाविद्यालयात भेंट प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी फक्त महाविद्यालयाचा प्रवेशअर्ज akjertn. ac.in या वेबसाईटद्वारे भरावयाचा आहे. असे महाविद्यालयातर्फे कळवले आहे. १९८८-८९ पासून संपूर्ण राज्यात एचएससी व्होकेशनल शाखेमध्ये वाणिज्य, कृषी, तांत्रिक डेअरी, मस्त्य, पैरामेडिकल यांसह सहा गटात ३० विविध अभ्यासक्रम सुरू आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 24/May/2025