लांजा, दि. २४ मे २०२५: लांजा तालुक्यातील भांबेड पवारवाडी येथील रहिवासी रविंद्र आत्माराम बाईत (वय ४७) यांचा कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना १८ मे २०२५ रोजी घडली. मृत्यूचे कारण लिव्हर सिरोसिस आणि सेप्टिसेमिया असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा (आमू. क्रमांक २७/२०२५) भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.एस.) १९४ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र बाईत यांना १८ मे रोजी अचानक पोटात दुखणे आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांच्या नातेवाइकांनी तातडीने त्यांना लांजा येथील सोनाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते; परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालानुसार, त्यांना लिव्हर सिरोसिस आणि सेप्टिसेमिया या आजारांचा त्रास होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून दाखल करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 24-05-2025














