रत्नागिरी : बीएसएनएल (भारतीय दूरसंचार निगम लि.) सेवा जाणीवपूर्वक कोलमडवण्याचे कारस्थान केले जात असल्याची भीती बीएसएनएलने व्यक्त केली. तालुक्यातील फणसवळे, दांडेआडोम भागांमध्ये अशा प्रकारचा गंभीर प्रकार घडला आहे.
बीएसएनएलच्या टॉवरवर चढून काही जण चुकीच्या दिनेशे युनिट फिरवून सेवा विस्कळीत करत आहेत, असे कारस्थान सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. कालच्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत हा प्रकार कंपनीने सांगितला. बीएसएनएलच्या येथील ग्राहकांनी हा प्रकार उघड केला. केंद्रशासनाच्या बीएसएनएल कंपनीमुळे संवादक्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडली. मोबाईल आणि टेलिफोनवरील संवादामुळे लोक, नातेवाईक कितीही लांब असले तरी ते जवळ आले; परंतु या क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांनी शिरकाव केला आणि मोफत सेवेचे गाजर दाखवत या कंपन्यांनी पाय पसरले.
बीएसएनएलच्या ग्राहकांवर याचा थेट परिणाम झाला त्यात केंद्र शासनानेदेखील या कंपनीला ऊर्जितावस्था देण्याच्यादृष्टीने गरजेच्यावेळी आर्थिक पाठबळ दिली नाही. त्यामुळे बीएसएनएल कंपनीला उतरती कळा लागली, त्यांचे ग्राहक हळूहळू जीओ, एअरटेल, आयडिया आदी खासगी कंपन्यांकडे वळले. बीएसएनएल कंपनी पुरती डबघाईला आली. ७० ८० टक्के कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
केंद्र शासनाने बीसएनएलला नवसंजीवनी देण्यासाठी फोर-जी सेवा सुरू केली, याचा परिणाम खासगी कंपन्यांवर होणार आहे. जिल्ह्यात बीएसएनएलचे १८८ नवीन टॉवर उभारले जात आहेत. त्यापैकी १०६ उभारले आहेव. उर्वरित लवकरच उभारले जाणार आहे; परंतु बीएमएनएची सेवा कोलमडवून त्यांचे ग्राहक आपल्याकडे खेचण्याचे कारस्थान सुरू असल्याचे शिवसेनेच्या आढावा बैठकीत उघड झाले.
रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे, दांडेआडोम येथील ग्राहकांच्या बीएसएनएलच्या सेवेबाबत कायम तक्रारी आहेत. वारंवार सुधारणा करूनही तिथे रेज मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तिथे वाँच ठेवून एक गंभीर प्रकार उघडकीस आणला. बीएसएनएलच्या टॉवरवर चढून काही जण त्यांचे युनिट चुकीच्या दिशेला फिरवतात. त्यामुळे गरजेच्यावेळी तेथील ग्राहकांना रेंज मिळत नाही, कंपनीचे लोक येण्यापूर्वी युनिट आहे तसे केले जाते. यामुळे प्राहकांची सेवेबाबत ओरड सुरू होते आणि ग्राहक अन्य खासगी कंपन्यांकडे वळतात. हा प्रकार शिवसेनेने उघड केला आहे. पुरावा म्हणून त्याचे फोटोदेखील त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे आता बीएसएनएल कंपनी अधिक सतर्क झाली आहे.
आम्हाला कौतुक आहे की, बीएसएनएल कंपनीची ग्राहकांना एवढी काळजी आहे. त्यांनी जागरूकता दाखवून हा गंभीर प्रकार उघडकीस आणता, भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता आम्ही घेऊ- अमृता लेले, बीएसएनएलच्या मुख्य प्रबंधक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 24/May/2025














