वाकेड घाटात कार अपघात; ७० फूट खोल दरीत कोसळून एक महिला जखमी

लांजा, दि. २४ मे २०२५: मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात शनिवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास भरधाव कारचा भीषण अपघात झाला. कार (क्र. MH03DG2451) ६० ते ७० फूट खोल दरीत कोसळली, यात एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून, कारमधील चार प्रवाशांपैकी कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वेन मोर्जेलो (वय २१, रा. आगाशे, विरार पश्चिम) हा कार चालवत मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. कारमध्ये क्लाइड डिसोजा (वय ५६, मालवणी, मालाड), फ्लाबिया फर्नांडिस (वय २६, बोरिवली वेस्ट, गोराई) आणि रियोना (वय १८, आर्लेम, गोवा) असे प्रवासी होते. वाकेड घाटात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच वाकेड गावातील स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. लांजा पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून तपास सुरू केला असून, घाटातील रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 24-05-2025