माखजन : जीवनात जर यशस्वी व्हयचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याने जीवनात ध्येय निश्चित केले पाहिजे असे मत डॉ नेहा भायजे यांनी व्यक्त केले. त्या माखजन इंग्लिश स्कूल येथे विजयादशमी निमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी जि. सदस्य सुरेश भायजे संस्था सचिव दीपक पोंक्षे, संचालक किशोर साठे, सुभाष सहस्त्रबुद्धे, मुख्याध्यापिका सौ. रुही पाटणकर आदी उपस्थित होते.
डॉ भायजे पुढे म्हणाल्या की जीवनात ध्येय निश्चित असेलच पाहिजे, शिवाय जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, कष्ट करण्याची वृत्ती ह्या साऱ्याच गोष्टींमुळे जीवन समृद्ध होते असे नमूद केले. प्रत्येकाने वाचनाची आवड जोपासा, जीवनात अशक्य असे काहीही नाही ते शक्य करण्यासाठी मेहनत घ्या असा सल्ला दिला. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वयं शिस्त असली पाहिजे. जीवनात नक्की उपयोगी पडेल असे मत व्यक्त केले. डॉ स्नेहा भायजे ह्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. रशिया सारख्या देशात जाऊन किर्गिझस्तान मधील किर्गिझ रशियन स्लाव्हिक विद्यापीठात शिकून नुकतीच एम.बी.बी.एस होऊन आली. त्या ठिकाणी नैपुण्य मिळवल्याबद्दल व इंडियन मेडिकल कौन्सिल ची परीक्षा देखील रैंक ने उत्तीर्ण झाल्याबद्दल माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माखजन तर्फे कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव दीपक पोंक्षे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्ट तर्फे ठेवलेल्या विविध परितोषिकांचे वितरण यावेळी करण्यात आले. तीन भाषेत भाषण करणाऱ्या कल्याणी साठे हिला मानाची ढाल देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संचालक किशोर साठे, जि.प चे माजी सदस्य सुरेश भायजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव परब, तर आभार मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:24 PM 11/Oct/2024














