राजापूर : राजापूरच्या निवासी नायब तहसीलदार सौ. दीपाली पंडित यांची प्रशासकीय बदली कणकवली उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार (शिरस्तेदार) म्हणून झाली आहे. राजापूरच्या सुकन्या असलेल्या सौ. पंडीत यांची महसूल प्रशासनात ३५ वर्षे सेवा झाली आहे.
यातील बरीच वर्षे म्हणजे ३३ वर्षे त्यांनी राजापूर तालुक्यात तर दोन वर्षे लांजा तालुक्यात काम केले आहे. एक धडाडीच्या महिला अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. आपल्या सेवेत त्यांनी कायमच सर्वसामान्य जनतेच्या कामाला प्राधान्य देत काम केले. त्यामुळे दिपाली पंडीत यांच्याकडे आपले काम म्हणजे १०० टक्के होणार असा विश्वास त्यांनी आपल्या कार्यपध्दतीतुन निर्माण केला आहे.
राजापूर तालुक्यात त्यांनी मंडळ अधिकारी, पुरवठा निरीक्षक यांसह विविध विभागात काम केले आहे. गेली काही वर्षे त्या राजापुर तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा प्रशासकिय सेवेतील दांडगा अनुभव असल्याने कोणत्याही विभागाशी असलेले सर्वसामान्य जनतेचे काम मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा आहे.
त्यांची आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात उपविभागिय अधिकारी यांचे नायब तहसीलदार (शिरस्तेदार) म्हणून बदली झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:57 PM 24/May/2025














