कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 17 फूट इतकी आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील 3 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.

पंचगंगा नदीवर असलेला राजाराम बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे.
इथली वाहतूक कोल्हापूर महानगरपालिकेने बंद ठेवली आहे

जून महिन्याच्या अखेरीस हा बंधारा पाण्याखाली जात असतो, मात्र यावेळी मे महिन्यामध्येच हा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
बंधारा ओव्हर फ्लो झाल्याने चढणीच्या माशांची धडपड देखील पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

सलग पावसाने शेतीची कामे थंडावली असून पेरण्याही लांबणीवर पडणार आहेत.
कोल्हापूर शहरात आज (24 मे) सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:14 24-05-2025














