‘कोरे’ मार्गावरील रेल्वेगाड्या विलंबाने..

खेड : धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे गुरुवारी कोकण रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम झाला. नागपूर-मडगाव स्पेशलला ५ तास ‘लेट धावली सीएसएमटी-करमाळी उन्हाळी स्पेशलही साडेतीन तास उशिराने धावली. अन्य १०रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाल्याने प्रवाशी खोळंबले.

सीएसएमटी-करमाळी उन्हाळी स्पेशल ३ तास २५ मिनिटे तर उधना-मंगळूर २ तास ५५ मिनिटे, दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे, तर सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस १ तास २० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली.. एलटीटी-करमाळी वातानुकूलित स्पेशलही १ तास २५ मिनिटे, रत्नागिरी-दिवा पेसेंजर १ तास ५० मिनिटे, सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस २ तास ३० मिनिटे तर दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस १ तास १० मिनिटे, एर्नाकुलम-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस १ तास ५० मिनिटे तर निजामुद्दीन एक्स्प्रेस २ तास विलंबाने मार्गस्थ झाली.

एलटीटी-तिरुवअनंतपूरम स्पेशलची २९ मे रोजी अखेरची फेरी
कोकण मार्गावर ३ एप्रिलपासून चालवण्यात येत असलेल्या एलटीटी-तिरुवअनंतपूरम साप्ताहिक उन्हाळी स्पेशलच्या फेऱ्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. २९ मे रोजी स्पेशलची अखेरची फेरी आहे. स्पेशल एलटीटीहून सायंकाळी ४ वाजता सुटून तिरुवअनंतपूरम येथे त्याच दिवशी रात्री १०.४५ वाजता पोहोचते. परतीच्या प्रवासात तिरुवअनंतपूरम येथून पहाटे ४.२० वाजता सुटणारी स्पेशल त्याच रात्री १२.४५ वाजता एलटीटीला पोहोचते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 24/May/2025