चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कोंडमळा येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या आराम बसला पाठीमागून दुसऱ्या आराम बसने धडक दिल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. याप्रकरणी माणिक ट्रॅव्हल्सच्या चालकाविरुद्ध सावर्डे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद कविता ट्रॅव्हल्सचा चालक रामेश्वर अर्जुन कराड (३०, रा. भिवंडी ठाणे) यांनी दिली आहे. कराड हे आपल्या ताब्यातील गाडी बोरिवली ते गणपतीपुळे रत्नागिरी असे घेऊन जात असताना सावर्डे नजीकच्या कोंडमळा सीमेचीवाडी येथे महामार्गावर रस्त्यालगत उभी केली होती. त्याचवेळी मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या माणिक ट्रॅव्हल्स गाडीची पाठीमागून जोरदार धडक बसली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 24/May/2025














