रत्नागिरी : वादळ पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून स्थलांतरित होण्यासाठी 21 बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी 248 कोटी शासनाने मंजूर केले आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे दिली.
चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात चिपळूण व गुहागर तालुका मान्सूनपूर्व आढावा बैठक आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, वाशिष्ठी नदीमधून गतवर्षी 1 लाख 19 हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असून डिसेंबर 2021 पासून एकूण 20 लाख 99 हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. वणवे लावणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हे दाखल करा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी दिली.
ते म्हणाले, पुढील 4 महिने चांगले काम करा. गेल्या 4 दिवसात पडलेल्या पावसाने, निसर्गाने धोक्याची घंटा दिली आहे. आपत्कालीन घटना कोणत्याही तालुक्यात घडणार नाही, याची दक्षता घ्या. प्रांतांनी ज्या अधिकाऱ्यांवर, ज्या पथकांवर जी जबाबदारी दिली आहे, ती सतर्कतेने पूर्ण करा. त्याबाबत दररोज कामकाजाचा आढावा घेण्यात यावा. कृषी विभागाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. खैर, बांबू लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रवृत्त करा. वणवे लावणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हे दाखल करा. बियाणे, खते, त्याची मागणी, त्याची उपलब्धता, वाशिष्ठी नदीतून काढण्यात आलेला गाळ याबाबतही त्यांनी आढावा घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 24-05-2025














