Maharahtra Rain Update: वाऱ्यांचा ताशी वेग ५० ते ६० किमी असणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

पुणे : Maharahtra Rain Update: दक्षिण कोकण किनारपट्टीलगत मध्य पूर्व अरबी समुद्रावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र स्थिर आहे. यामुळे पुढील चार दिवसांत (दि. २३ ते २६) कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार, तर काही भागात अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे, तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

तसेच पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यांतील घाट विभाग, नांदेड, लातूर, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. यावेळी वाऱ्यांचा ताशी वेग ५० ते ६० इतका असेल. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट दिला आहे, तर अन्य जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार असून, या जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट दिला आहे. ( Maharahtra Rain )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:57 24-05-2025