मंडणगड : नवरात्रोत्सवाचे औचीत्यसाधून शहरातील परिवार पार्क येथे सोसायटीचे सांस्कृतिक मंडळाचेवतीने 9 ऑक्टोंबर 2024 रोजी भक्ती व सुगम संगीतांचे मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. विजय जोशी यांनी श्री गणेशस्तुती, दुर्गास्तुती व तोडी रागाचे पुर्वांगात जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता या भजनाने कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली. यानंतर प्रथमेश जोशी यांनी गणेश पंचरत्न स्त्रोत्र, जय जय जगदंबे श्री अंबे रेणुके कल्पकदंबे ही आरती सादर केली. देवयानी जोशी हीने गजानना श्री गणराया व पुर्या धनश्री रागातील बंदीश सादर केली. यानंतर बाल कलाकार मल्हार देवघरकर याने विठु मावूली तु मावूली जगाची, मेरी माँ के बराबर कोई नही, हर हर शंभु शिव महादेवा शंभो ही गीते सादर केली. विजय जोशी यांनी हनुमान चालीसा व कशी जाशील राधे सांग मला ही गौळण तर सुशिल देवघरकर यांनी आई भवानी तुझ्या कृपेने तारिशी भक्तांना, सखी मंद झाल्या तारका, व भैरवीत राम रघुनंदाना आश्रमात कधी रे येथील हे गीत सादर केले.
दोन तासाहून अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमात भक्ती व सुगम संगीत प्रकारातील एकाहून एक सरस गीते सादर करुन भक्तीमय वातावरणन निर्माण करीत रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमास निलेश लांबे, सिंथेसायझर, विजय जोशी संवादिनी, यशपाल बोलाडे ढोलक ढोलकी, संजय अवेरे साईड हीदम यांनी संगीत साथ दिली. कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन शशिकांत पोस्टुरे यांनी केले. या कार्यक्रमास भाजपा तालुका अध्यक्ष अप्पासाहेब मोरे, गिरिष जोशी, विजय दरिपकर, मुख्याध्यापक रामचंद्र कापसे, रुपेश साळुंखे, कौस्तुभ जोशी, सौरभ घोसाळकर, पंकज कुलकर्णी, यांच्यासह परिवार पार्क येथील महिला व परुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:50 PM 11/Oct/2024