नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये (NTRO) ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी जागा रिक्त आहेत.
नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) ने विविध वैज्ञानिक बी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी नक्कीच आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनकडून या भरती प्रक्रियेतून 75 पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 8 नोव्हेंबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
ntro.gov.in वर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी.या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये.
30 वर्षांपेक्षा अधिक वय भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे नसावे. या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारली जातील. उमेदवारांना recruit-ndl.nielit.gov.in वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरसह नोंदणी करावी लागेल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीमधून उमेदवाराची निवड ही केली जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:50 11-10-2024














