पावस : विधानसभा निवडणुकीमध्ये पावस बाजारपेठ मार्गाचे कॉक्रिटीकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु त्या बाबतीत कोणत्याही हालचाली न झाल्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात या मार्गावर खड्डे पडण्यास सुरवात झाली असून मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
गोळप ते बाजारपेठमार्गे पावस या अरुंद रस्त्यामुळे पर्यायी मार्ग काढण्यात आला. त्यानंतर या मार्गावर रस्त्याला गटारे नसल्यामुळे दरवर्षी रस्त्यावर वारंवार खड्डे पडत होते. हे खड्डे तात्पुरते बुजवले जात होते, परंतु रस्त्याच्या दुतर्फा गटारे नसल्याने पावसाळ्यामध्ये पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे दरवर्षी खड्डे पडण्याचे प्रमाण वाढतच आहे.
पाच वर्षांपूर्वी या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु पुन्हा हा रस्ता खड्यात गेला आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी विधानसभा निवडणुकीत कॉक्रिटीकरणाचे आश्वासन देण्यात आले. त्यासाठी निधीही उपलब्ध झाला, परंतू रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे पावस बाजारपेठमार्गे दुचाकी, रिक्षा चालवणे धोकादायक ठरत आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 26/May/2025














