चिपळूण नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाची संरक्षक भिंत कोसळली

चिपळूण : शहरातील शिवाजीनगर येथील डोंगर माथ्यावर असलेल्या नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाभोवतीची संरक्षक भिंत मुसळधार पावसात कोसळली. ४५ मीटर लांब व दोन फूट रुंद अशी ही संरक्षक भिंत कोसळली असून या घटनेमुळे नगरपालिकेचे मोठे नुकसान झाले आहे.

पालिकेने घनकचरा प्रकल्पासाठी २००६ मध्ये साडेसहा एकर जागा शिवाजीनगरच्या डोंगर माथ्यावर खरेदी केली होती. त्यानंतर काही वर्षातच ही जागा पालिकेने विकसित करून सभोवती संरक्षक भिंत व अंतर्गत रस्ते तयार केले.

साधारण २०११ दरम्यान उभारलेली ही संरक्षक भिंत ढासळू लागली होती. सध्या सुरू असलेल्या पावसात संरक्षित भिंतीतील ४५ मीटरचे बांधकाम पूर्ण जमिनदोस्त झाले आहे. संरक्षक भिंतीचे तुटलेले साहित्य हटविण्याचे काम सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 26/May/2025