पावस : लांजा तालुक्यातील हर्चे येथील आयुष्यमान आरोग्य केंद्रात ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत २०२५’ मोहिमेच्या अनुषंगाने ग्रामस्थांची एक्स-रे तपासणी करण्यात आली. शिबिरात ग्रामस्थांना रक्तदाब, मधुमेह, रक्त, लघवी तपासणी मोफत करण्यात आली. हा कार्यक्रम सरपंच श्रीमती दीप्ती दीपक तरळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
पीपीएम को-ऑर्डिनेटर श्रीकांत सावंत यांनी दप्तर तपासणी करून मार्गदर्शन केले. डीटीसी आरोग्य सहाय्यक मंगेश पाटील यांनी कीटकजन्य व जलजन्य आजारांबाबत घ्यावयाच्या काळजीबद्दल मार्गदर्शन केले. शिबिराला एक्स-रे तंत्रज्ञ नीलेश हंगे, तालुका सुपरवायझर (टीबी) मिलिंद संसारे, मिथिन मयेकर, आरोग्य निरीक्षक डी. व्ही. गुरव, सीएचओ एम. बी. येसरे, श्रीमती एम. एम. आग्रे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 26/May/2025














