खेड : स्विफ्ट कारची पल्सर दुचाकीला धडक; पोलिस निरीक्षकांच्या मदतीने दांपत्यावर वेळीच उपचार

मंडणगड : रत्नागिरी येथे कार्यालयीन बैठकीसाठी निघालेल्या मंडणगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांनी दाखविलेल्या समयसुचकतेमुळे खेड दस्तुरी येथे अपघातात जखमी झालेल्या मंडणगड तालुक्यातील कुंबळे येथील दांपत्याचे प्राण वाचले.

२४ मे रोजी खेड दस्तुरी येथे दुपारी सव्वादोन वाजता घडलेल्या या अपघातातबाबत प्राप्त माहितीनुसार पोलिस निरीक्षक नितीन गवारे हे त्यांच्या गाडीचे चालक श्री. देसाई यांच्यासह मंडणगडहून रत्नागिरी येथे बैठकीसाठी निघाले होते.

वाटेत दुपारी दोन वाचण्याचे सुमारास खेड तालुक्यातील दस्तुरी फाट्याजवळ मोटार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. यातील दुचाकीचालक गंभीर जखमी होता. त्याचे दोन्ही पाय बाजूला मोहलेले आढळले.

रक्त वाहत होते. बाजूलाच थोड्या अंतरावर एक महिला पाय तुटलेल्या अवस्थेत पडली होती. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमलो होतो पण पुढे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कोणी पुढे येत नव्हते. परिस्थिती पाहता दोन्ही जखमीना तत्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक होते. यासाठी रुग्णवाहिकेची वाट बघण्यात वेळ जाणार होता. त्यामुळे पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांनी चालक श्री. देसाई यांच्या मदतीने जखमीना तत्काळ पोलिस गाडीने हॉस्पिटलला नेण्याचे ठरविले.

घटनास्थळी जमलेल्या लोकांच्या मदतीने दुचाकीस्वाराला पोलिस जीपमध्ये उचलून ठेवले. तसेच जखमी महिलेलाही दुसऱ्या एका जीपमध्ये उचलून ठेवले आणि दोन्ही गाड्या सुसाट वेगात सायरन वाजवत खेड येथील डॉ. तलाठी यांच्याकडे गेल्या. तिथे मुख्य डॉक्टर उपलब्ध नसल्याने आणि जखमींवर तत्काळ उपचार करणे आवश्यक असल्यामुळे तत्काळ रुग्णवाहिका बोलावून दोन्ही जखमींना खेड येथील यश हॉस्पिटल येथे नेण्यात आले.

तेथील डॉक्टरांनी दोन्ही जखमींवर तत्काळ उपचार केले. त्यामुळे दोन्ही जखमींचे प्राण वाचले. पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांनी तेथून जखमीच्या घरी फोन करून त्यांना बोलावून घेतले, अपघात एवढा जबरदस्त होता की, दुचाकीचे सर्व भाग निखळून रस्त्यावर पडले होते. पोलिस घटनास्थळी पोहचल्यामुळे आणि त्यांनी तत्काळ निर्णय घेतल्यामुळे अपघातग्रस्त दोन जीवांचे प्राण वाचले. अपघातात जखमी जखमी आकिव कामाने आणि त्याची पत्नी आफिया कामाने कुंबळे येथील रहिवासी असून जखमी प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणा होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 26/May/2025