पावस : गेले तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे पावस पंचक्रोशीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. रत्नागिरी तालुक्यातील गोळप-बौद्धवाडी येथील बौद्धविहाराची संरक्षक भिंत कोसळली असून, त्याचे सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे.
मॉन्सूनपूर्व पावसामुळे पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मे महिन्यामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोळप बौद्धविहारची इमारत बांधण्यात आली. त्याच्या संरक्षणाच्यादृष्टीने संरक्षक भिंत्त बांधण्यात आली होती. या भिंतीजवळ गटार असल्यामुळे पावसामुळे भेगा गेल्यामुळे दिवसभर सतत पडणाऱ्या पावसामुळे येथील संरक्षक भिंत अचानकपणे पडली. त्यामुळे ५० हजारांचे नुकसान झाले आहे.
भिंत पडल्यानंतर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पावस, फणसोप, नाखरे, पूर्णगड, गणेशगुळे, निरूळ आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.
रत्नागिरी तालुक्यात ५९ मि.मी. पाऊस
रत्नागिरी तालुक्यातील नऊ मंडलांमध्ये सरासरी ५९ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. यामध्ये पावस ६८, जयगड-५०, मालगुंड- ४२, खेडशी- ६७, रत्नागिरी- ६८, तरवळ ७२, फणसोप- ६५, पाली- ५८, कोतवडे – ४९ इतक्या मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 26/May/2025














