राजापूर पालिकेकडून नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने फायबर बोटीतून प्रात्यक्षिक

राजापूर : राजापूर नगरपालिकेकडून नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने फायबर बोटीतून शनिवारी प्रात्यक्षिक करण्यात आले.

राजापूर शहरात पावसाळ्यात दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होते.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राजापूर पालिकेने नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने नियोजन केले आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून पालिका कर्मचाऱ्यांनी अर्जुना नदीपात्रात खाडीकिनारी फायबर बोटीचे प्रात्यक्षिक केले. पालिकेमार्फत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत प्रशासक तथा सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. जैस्मिन, मुख्याधिकारी वैभव गारवे, पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदशर्नाखाली फायबर बोटीतून प्रात्यक्षिक करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 26-05-2025