पावसामुळे रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य, तरुणानं थेट दुचाकी खांद्यावर उचलून रस्ता ओलांडला

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कुळकजाई गावात पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः दैना झाली आहे. रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, एका युवकाला आपली दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करावा लागला.

नेहमी आपण दुचाकीवरून रस्ता पार करत असतो, मात्र कुळकजाई येथे पावसामुळे रस्ते पूर्णतः चिखलयुक्त आणि खड्ड्यांनी भरलेले आहेत.

अशा परिस्थितीत वाहन चालविणे अशक्य बनले असून, नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

याबाबत संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 26-05-2025