रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंद येथे मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात एक व्यक्ती सायकलसह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. राजेंद्र सोनू कोळंबे (वय 48) असे या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सकाळी घडली, जेव्हा राजेंद्र नाईट ड्युटी आटोपून सायकलवरून घरी परतत होते.
प्राप्त माहितीनुसार, राजेंद्र हे कामावरून घरी जात असताना पूल ओलांडत होते. मात्र, पुलावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे त्यांचा तोल गेला आणि ते सायकलसह पाण्यात वाहून गेले. पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने बचाव कार्यात मोठ्या अडचणी आल्या. स्थानिकांनी शोधकार्य सुरू केले आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर वाहत असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:50 PM 26/May/2025













