कडवई : गणपतीपुळे येथून कोपरखैरणेकडे निघालेल्या एका ट्रॅव्हल्स बसने काल २५ मे रोजी तुरळ फाटा येथे एका डंपरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून, चालक आणि काही प्रवासी जखमी झाले आहेत.
कडवईत जाणारा एम एच १२ डब्लू जे ४७५१ क्रमांकाचा डंपर तुरळ फाटा येथून वळत असताना, मागून येणाऱ्या एम एच ४३ सी इ ४२९३ क्रमांकाच्या ट्रॅव्हल बसने त्याला धडक दिली. या धडकेमुळे बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 26/May/2025














