खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील नव्या जगबुडी पुलावरून मोटार नदीत कोसळून ६ जणांचा नाहक बळी गेल्यानंतर त्याकडे राष्ट्रीय महामार्ग विभाग गांभीर्याने पाहात नसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून कुचकामी उपाययोजनांचा अवलंब सुरू आहे. जगबुडी पुलावर झालेल्या अपघातस्थळी उभारलेले गर्डर काही तासांतच हटवून तेथे ३ रिकामी पिंप उभी केली आहे. यामुळे ठोस उपाययोजना करण्यासाठी आणखी किती बळी हवेत, असा केला जात आहे.
मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यापासून परशुराम घाटापर्यंत वाहनचालकांचा प्रवास वेगवान झाला असला तरी भोस्ते घाटातील अवघड वळणासह नव्या जगबुडी पुलावरील वळणामुळे अपघाताची मालिका थांबलेली नाही. तीन दिवसांपूर्वी घडलेला अपघात तीन वर्षातील मोठा अपघात होता.
या दुर्घटनेनंतरही महामार्ग खात्याने तातडीच्या डागडुजीची तसदी घेतलेली नाही. भीषण दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याने काही तासातच अपघातस्थळी तीन गर्डर बसवले. ही मलमपट्टी टीकेची धनी बनताच काही तासातच अपघातस्थळावरून गर्डर बाजूला हटवत वळणालगत उभे केले. त्यामुळे अपघातांचा धोका आणखी वाढला आहे. तसेच जगबुडी पुलाच्या अपघाताच्यादृष्टीने संवेदनशील ठिकाणी चक्क तीन रिकामे पिंप उभे करत केवळ वेळ मारून नेली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 26/May/2025














