दापोली : वानोशी तर्फे नातू येथे जनावरांचा गोठा कोसळून एक गाय दगावली

दापोली : तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे २६ मे रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास वानोशी तर्फे नातू येथील चंद्रकांत शंकर चव्हाण यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा कोसळला.

या घटनेत गोठ्यातील एकूण सहा जनावरांपैकी एक गाय दगावली असून, अन्य पाच जनावरे जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सुरज चव्हाण यांनी तातडीने जेसीबी, मजूर आणि गावकऱ्यांच्या मदतीने इतर जनावरांना वाचवले.

या घटनेची माहिती स्थानिक तलाठी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली असून, त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. या दुर्घटनेत चव्हाण यांचे मोठे नुकसान झाले असून, जनावरांची वैरणही पावसात भिजली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 26/May/2025