चिपळूण : तरुणाची गळफास लावून आत्महत्या

चिपळूण : तालुक्यातील मार्कडी येथील तिरुमला अपार्टमेंटमधील परेश अनिल चतुरे (३३) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २३ मे रोजी रात्री ९.४५ वाजण्यापूर्वी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मूळचा शांतीनगर, लोणीखुर्द, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असलेला परेश चतुरे हा सध्या मार्कडी येथे राहत होता. चिपळूण पोलिसांनी २४ मे रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चिपळूण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 26/May/2025