मंडणगड : मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यात हजेरी लावताच तालुका प्रशासन सतर्क झाले आहे. तालुका प्रशासनाने पावसाळ्यात दरड कोसळण्याची आपत्ती लक्षात घेऊन ग्रामस्थांना सावधानतेच्या सूचना केल्या आहेत. तालुक्यातील १५ गावांतील दरड प्रवण क्षेत्रातील २७१ घरांतील १,०४६ ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतराचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत.
बाणकोट मोमीनवाडी येथील २० घरे, नारायणनगर हनुमान पारवाडी तळेवाडी ६७ घरे, वेसवी ८ घरे, वाल्मिकीनगर ३९ घरे, कोंडगाव ७ घरे, बहिरवली सोनारवाडी १४ घरे, गोवेले १५ घरे, चिंचघर ७ घरे, चिंचाळी २१ घरे, लोकरवण २४ घरे, कुड्डुकखुर्द हनुमानवाडी १४ घरे, साखरी ६ घरे, मंडणगड धनगरवाडी ८ घरे, दाभट बौद्धवाडी १८ घरे, शेनाळे ३ घरे अशा २७१ घरांमधील ग्रामस्थांना स्थलातरांचे आदेश देण्यात आले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी व्यवस्था म्हणून संबंधितांची जिल्हा परिषद शाळांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 26/May/2025














