नवीन शैक्षणिक धोरण : विद्यार्थी गैरहजर राहिला तर पालकांना येणार मेसेज

रत्नागिरी : नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळेत विद्यार्थ्यांची दिवसातून तीन वेळा हजेरी घेण्याची सूचना शाळांना करण्यात आली आहे. विद्यार्थी गैरहजर असल्यास पालकांच्या मोबाइलवर तसा संदेश पाठविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दिवसातून तीन वेळा हजेरीचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे.

दैनंदिन तीन वेळा हजेरी घेण्याबरोबर शाळेमध्ये मूलभूत सुविधा पुरविणे, शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, त्याचा एक महिन्याचा बॅकअप ठेवणे, खासगी शाळांमध्ये सुरक्षारक्षकांची नियुक्ती, अनधिकृत व्यक्तींचे प्रवेश थांबविणे, शाळेच्या भिंतीवर सुरक्षेविषयक माहिती देणारे फलक लावणे, नियुक्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेणे, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची उपलब्धता करून देणे, यासह इतर सुविधांची उपलब्धता करण्याच्या सूचना करण्यात आले आहे. सूचनांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार असल्याचे सूचित केले आहे.

नवीन शैक्षणिक सत्रातील शाळा दि. १६ जूनपासून सुरू होणार आहेत. त्या दिवसापासून दिवसातून तीन वेळा हजेरी घेण्यात येणार आहे. एखाद्या वेळी विद्यार्थी वर्गात नसेल, तरीही पालकांना एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा किंवा शाळेचा एखादा तास चुकविता येणार नाही.

पोटचा गोळा शाळेत सुरक्षित राहणार
आई-वडिलांचा पोटचा गोळा शाळेत पाठविण्यासाठी त्याची सुरक्षा महत्त्वाची असल्याने हजेरीचा निर्णय योग्य आहे.

शालेय शिक्षण विभागाचे नवे आदेश काय ?
शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची दिवसातून तीन वेळा हजेरी घेण्याचा निर्णय जारी केला आहे.

शाळेच्या आवारात सीसीटीव्ही बंधनकारक
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेच्या आवारात सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केले आहे.

वर्गात मुलांची दिवसातून तीनदा हजेरी
विद्यार्थी शाळेत आल्यावर, दुपारी व त्यानंतर शाळा सुटण्यापूर्वी अशी एकूण तीन वेळा वर्गातील मुलांची हजेरी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक
शाळेतील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे चारित्र्य प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचार घेत, शिक्षण विभागाने काही महत्त्वपूर्ण नियम जारी केले आहेत. प्रत्येक शाळेला या नियमाचे पालन करावे लागणार आहे. शिवाय विद्यार्थी तणावाखाली असतील, तर समुपदेशन करण्यासाठी समुपदेशक नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे.

विद्यार्थी गैरहजर असल्यास पालकांना मेसेज
दिवसातून तीन वेळा विद्यार्थ्यांची हजेरी घेत असताना, विद्यार्थी गैरहजर असल्यास पालकांना त्वरित एसएमएस पाठविला जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:57 PM 27/May/2025