खेड : शहरातील विदर्भ कोकण बँकेत कार्यरत असलेल्या सुप्रिया विनायक वनशा (३२, रा. भाईंदर-ठाणे) या तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. भावाच्या आत्महत्येचे दु:ख सहन न झाल्याने तिने हा टाेकाचा निर्णय घेतल्याचे तिने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या डायरीतून समाेर आले आहे.
खेड शहरातील कुंभारआळी येथील ग. म. पाटणे संकुलात सुप्रिया वनशा राहत हाेती. ती विदर्भ काेकण बँकेत कामाला हाेती. गुरुवारी दिवसभर तिने काेणताच प्रतिसाद न दिल्याने दरवाजा ताेडला असता तिने छताच्या लोखंडी हुकला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समाेर आले.
सुप्रियाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या डायरीतून या घटनेमागील कारण समोर आले आहे. भावाने केलेल्या आत्महत्येचे दुःख तिला सहन होत नाही आणि त्या आत्महत्येपासून ती सतत तणावाखाली होती. हे दुःख असह्य झाल्यानेच ती आत्महत्या करत असल्याचे तिने डायरीत लिहिले होते. पोलिस तपासानंतर तिच्या आत्महत्येच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.
तीन महिन्यांपूर्वी भावाची आत्महत्या
तीन महिन्यांपूर्वी तिच्या भावाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. तेव्हापासून सुप्रिया तणावाखाली होती आणि भावाच्या आत्महत्येचे दुःख सहन न झाल्यानेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:28 26-05-2025














