खेड : वेरळ येथे दोन कंटेनरमध्ये धडक

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर भोस्तेघाटाच्या पायथ्याशी वेरळ येथील स्वरूप धाब्याजवळ दोन कंटेनरमध्ये समोरासमोर धडक अपघात झाला. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाली. काळ संध्याकाळी ही घटना घडली.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, भोस्तेघाट उतरून येणारा व मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर व गोव्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर धडक बसली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालक केबिनचा चक्काचूर झाल्यामुळे दोन्ही चालक जखमी झाले. या दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक बसल्याने ट्रकमधील चालक गंभीर जखमी होऊन ट्रकमध्ये अडकला होता.

अथक प्रयत्नाने स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी ट्रकचालकाला सुरक्षित ट्रकच्या केबिनच्या बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 27/May/2025