लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड-बोरथडेफाटा येथे अनोळखी चारचाकी वाहनाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने स्वार गंभीर जखमी झाला. काळ सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. निशांत वाडकर (वय २४, रा. ठाणे) असे जखमी स्वाराचे नाव आहे. त्याच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर दुचाकीच्या मागे बसलेली तरुणी किरकोळ जखमी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निशांत वाडकर हे आपल्या दुचाकी घेऊन गोव्याहून गणपतीपुळेच्या दिशेने जात होते. दुचाकी सायंकाळी ५ वाजण्याच्यादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर बोरथडे-वाकेडफाटा येथे आली. तेव्हा एका अज्ञान चारचाकीने त्यांना समोरून जोरदार धडक दिली. दुचाकीचालक वाडकर जोरदार आदळले. अनोळखी चारचाकी वाहनाने अपघात करून पलायन केले.
अपघाताची माहिती स्थानिक वाकेड येथील नागरिकांना मिळताच जिजाऊ संघटना तालुकाप्रमुख योगेश पांचाळ, प्रशांत भितळे, महेश देवरूखकर, विजय सुवारे व अन्य ग्रामस्थांनी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था रुग्णवाहिका चालकाला तत्काळ संपर्क साधून जखमी निशांत याला लांजा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. या अपघाताची नोंद करण्याच्याची प्रक्रिया लांजा पोलिस ठाण्यात उशिरा सुरू होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 27/May/2025














